हाक १६

Call 16


<हाक १६: गुपित>

हेतुपुरस्सर लपवून ठेवलेले जे काही असते ते गुपित. एखादी कल्पना, भावना, विचार, वस्तुस्थिती किंवा वस्तू लपवून ठेवलेली असू शकते. व्यक्ती किंवा समुदाय नेहमी एखाद-दुसरी बाब एकमेकांपासून लपवून ठेवत असतात. पालकांच्या नजरेआड मुलाने हळूच आईसक्रीम खाणे, डायरीत नोंदवून ठेवलेले प्रेमप्रकरण, आप्तस्वकीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना न सांगितलेला एखाद्याचा दुर्धर आजार किंवा सरकारी सत्ता कोलमडून पडेल या भयाने उघडकीला न आणलेला पुरावा असे काही गुपिताचे नमुने आपण आजूबाजूला पाहू शकतो. गुपिताचे मोल आणि ताकद लक्षात घेता लपवण्याची कृती व्यक्ती तसेच समूह स्तरावर गुंतागुंतीची आणि जोखमीची ठरू शकते. फसवणूक करण्याची खवखव, सत्ता काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा, मनोरंजनासाठी खेळ किंवा कथनाला रचनाबद्ध करण्याची सर्जनशील ऊर्मी अशा आणि इतर प्रकारे काहीतरी गुपित ठेवणे किंवा असणे व्यक्ती आणि समाजाला वेगवेगळ्या स्तरावर प्रभावित करत असते. 

लपवण्याच्या  वेगवेगळ्या आयामांचा शोध ‘हाकारा‘च्या १६ व्या आवृत्तीतून आम्ही घेऊ इच्छितो. 

लपवण्याच्या कृतीचा अर्थ एखाद्या व्यक्ती आणि समाजासाठी काय असू शकतो? झाकून ठेवणे आणि उघडकीस आणणे याला आपण दैनंदिन जीवनात कसे सामोरे जात असतो? सामाजिक व्यवहार, सत्ताकारण आणि उतरंडीची व्यवस्था यामधून छुप्या कृती कशा आकाराला येत असतात? ऐतिहासिक प्रक्रिया आणि सांस्कृतिक व्यवहार यावर या सर्वांचा कसा प्रभाव पडत असेल? एखादीची सर्जनशील प्रक्रिया आणि अभिव्यक्ती ‘गुपित’ या विषय- संकल्पनेला सामोरी जात कशी आकाराला येत असेल?

तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतन रूपी मांडणी  करणारे अभ्यासक किंवा कथा – कविता करणारे साहित्यिक असाल वा दृश्य-माध्यमातील कलाकार, गुंफणकार (क्युरेटर), किंवा समाजशास्त्राच्या अंगाने विश्र्लेषण करणारे संशोधक असाल, तर तुमचे ‘हाकारा’ सोळाव्या आवृत्तीच्या पारावर ‘गुपित’हाकेसाठी स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती जुलै ७, २०२२  पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. 

निवडक साहित्याचा/कलाकृतींचा समावेश हाकारा । hākārā च्या येत्या अंकात केला जाईल. अधिक माहितीसाठी इथे भेट द्या.  

आशुतोष पोतदार  
संपादक, हाकारा । hākārā

‘हाकारा’च्या सोळाव्या आवृत्तीच्या अतिथी संपादक पूर्वी राजपुरिया असतील.

‘गुपित‘ हा विषय हर्षिता बथवाल यांनी सुचविला आहे.

***

< Call 16 :Secrecy >

Secrecy is hiding something deliberately. It could be an idea, an emotion, a thought, a piece of information or an object. An individual or a community partakes in secrecy all the time. It could be a small secret, like that of a child who ate an ice cream at a school, but wants to hide it from her parents, a love affair locked in a diary entry, a terminal illness kept away from a family member, or a piece of documentary evidence concealed from the public that might risk toppling a government. What we choose to keep hidden reveals points of our collective and individual shame, fears, power, desires and sense of boundaries.  Ranging from religious to political to personal reasons, we keep some information deliberately hidden from each other in society. 

Knowing the value and power of a secret, the act of concealing can be complex, subtle and risky in private life or in public domain. Stemming from the desire to deceive, an ambition for power,  simple playfulness, or the creative urge of building a narrative structure, secrecy could have varying degrees of impact on an individual or a society.

We are interested in exploring different dimensions of secrecy in our 16th edition.

What does an act of concealing mean to a person or a group? What are the ways in which we encounter hiding and exposing in our everyday life? How are secrecy practices embedded in social practices, power dynamic and hierarchical structures? How has it influenced the historical processes and cultural practices? How have you responded to the theme of secrecy in your own artistic practices? 

You may be a fiction writer, social scientist, poet, social/ political activist, visual artist, cartoonist, critic, photographer, translator, or curator; we invite you to reflect on the theme of ‘Secrecy’ and contribute to Hakara’s sixteenth edition. Send us your work in Marathi and/or English or in an audio-visual form by July 7, 2022 to info@hakara.in. For submission guidelines, please click here

Select works will be published in the forthcoming edition of हाकारा। hākārā. 

Ashutosh Potdar
Editor, हाकारा । hākārā

Purvi Rajpuria will be Guest Editor for the 16th edition.

The theme of ‘Secrecy’ was suggested by Harshita Bathwal


लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती ‘हाकारा’च्या येत्या आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील विचार असलेल्या लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . ‘हाकारा’ हे ऑनलाइन जर्नल आहे त्यामुळे आपले लिखाण वा कलाकृती केवळ इमेलने पाठवा.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवा. (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे.) फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहून पाठवा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक शैली किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण ‘हाकारा’च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. निवड प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. ‘हाकारा’कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, ‘हाकारा’चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे परीक्षण करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधन निबंध पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच ‘हाकारा’कडे ते जमा करावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला ‘हाकारा’कडून निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश जरूर करा. हाकारा | hākārā हे मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

Submission Guidelines

  1. In response to the primary focus of the upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If a contributor wants to maintain a certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. The image size has to be 150 or more in resolution for visual work submission. Please share details of artworks including title, medium, size and year. In case, the images included do not belong to the contributor, a source of images should be provided.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
  6. We require a title page with the contributor’s contact information, a short abstract of the submission and a contributor’s bio as part of the submission process.
  7. Submissions must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles, please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, and images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, and images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from the original writer/publisher if the work will be accepted by हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from the हाकारा । hākārā team a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा।hākārā is a peer-reviewed bilingual journal of creative expression published online in Marathi & English. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.


One comment on “Appeal for Call 16

  1. Deepak J. Patil

    Thanks for sharing the subject. Will try to write on it.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *