Skip to content Skip to footer
Current Edition

Previous Editions

Spotlight

Discover an Artist

Authors List

Discover An Author

  • Artist

    केतकी सरपोतदार यांनी एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून २०१४ मधे फाईन आर्टस् मधून डिप्लोमा पूर्ण केला असून त्यानंतरचे शिक्षण एम एस युनिव्हर्सिटी, बडोदा येथून २०१८ मधे पूर्ण केले. लॅटिट्युड या गॅलरी आणि टीएपी यांनी २०२० मधे आयोजित केलेल्या ‘व्हेअर इग्नोरन्स इज ब्लिस’ या ऑनलाईन चित्र-प्रदर्शनात तर एम एस युनिव्हर्सिटी बडोदा यांनी २०१९ मधे आयोजित केलेल्या सोलो प्रदर्शनात केतकीने सहभाग घेतला होता.

“संगीत म्हणजे सगळा नाद-विरामांचा खेळ… विरामातून नाद निर्माण होणं आणि असंख्य नादवलयांतून निर्माण झालेल्या ह्या नादावलेल्या अवकाशाचं पुन्हा विरामाकडे परतणं म्हणजेच संगीत ! दोन विरामांच्या मध्ये असलेल्या नादात्मक अवकाशात बरंच काही घडतं, व्यक्त होतं, ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पोहोचवलं जातं खरं; पण तरीही नादाकडून विरामाकडे परतणं अनिवार्य असतं, व्यक्ताकडून अव्यक्ताकडेही जावंच लागतं, आणि काही सांगण्याच्या अवस्थेतून मौनाकडेही परतावं लागतं, तेव्हाच ‘संगीत’ बनतं !”


हाकारा | hākārā, आवृत्ती २४ : परतणे / Edition 24: To Return