लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. आपले लिखाण वा कलाकृती हाकारा | hākārā च्या प्रस्तावित आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना आणि जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील तसेच संशोधनात्मक लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.

२. हाकारा | hākārā तील मजकूर अभ्यासकांच्या पुनरावलोकनानंतर प्रकाशित केला जातो . हाकारा | hākārā हे ऑनलाइन नियतकालिक आहे त्यामुळे आपले लिखाण, कलाकृती केवळ इमेलने पाठवाव्यात.

३. लिखित मजकूर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवावा (पीडीएफ किंवा इतर कोणत्याही फाइलमध्ये नव्हे). फॉन्ट ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहिलेला असावा. लेखकांना त्यांचा मजकूर ठराविक मांडणी किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रेजोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि साल याची माहिती सोबत जोडा. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या. शिवाय, त्या वापरण्यासाठीची परवानगी आवश्यक आहे.

५. आपण पाठवलेल्या कलाकृती विडीओ असतील तर त्यांचा युट्यूब, विमिओ किंवा तत्सम संकेतस्थळावरील दुवा सोबत द्या. तो दुवा आपण हाकारा | hākārā च्या संकेतस्थळावर टाकू शकतो.

६. पाठवलेल्या साहित्याच्या पुनरावलोकन प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.

७. हाकारा | hākārā कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, हाकारा | hākārā चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे पुनरावलोकन करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या.

८. संशोधनपर निबंध (२५००-३००० शब्द मर्यादा) पाठवताना मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावेत.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच पुनरावलोकनासाठी आमच्याकडे पाठवावे.

१०. आपण इतरांच्या कलाकृती, प्रतिमा वा रेखाटने यांच्या समावेश आपल्या लिखाणात करणार असाल तर त्यांची पूर्वपरवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे. अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

११. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला  निर्णय कळविला जाईल.

१२. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१३. लिखाण वा कलाकृतींचे अधिकार (कॉपीराइट) संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश पुढीलप्रमाणे जरूर करा. हाकारा | hākārā हे मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१४. ‘हाकारा’ सध्या कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

१५. आपल्याला काही विचारायचे असेल किंवा साहित्य पाठवायचे असेल तर कृपया info@hakara.in या इ मेल द्वारे आम्हाला संपर्क साधावा.

१६. हाकारा । hākārā: ISSN 2581-9976 विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) केअर-लिस्ट मध्ये समावेश.

Submission Guidelines

  1. In response to the primary focus of the upcoming edition of हाकारा । hākārā, we welcome contributions that take on new and innovative forms and new ideas not previously analyzed or that extend beyond an older conversation in the field of creative expression and/or enquiry.
  2. हाकारा | hākārā is a peer-reviewed journal. Being an online journal, we accept only electronic submissions.
  3. The written work has to be submitted as a Microsoft Word document (as .doc and Not PDF or any other format), and be double-spaced text in 12 pt Times New Roman font as an attachment. For the text in Marathi, please follow Unicode format. If the contributor wants to maintain a certain style in presenting work, please inform Hakara Editors while submitting the work.
  4. The image size has to be 150 dpi or more in resolution for visual work submission. Additionally, If you wish to submit your work to the ‘Panorama’ section, images must be at least 1000×600 pixels. Please share details of artworks including title, medium, size and year. In case, the images included do not belong to the contributor, the contributor should provide a source of the images.
  5. Please don’t send video files to be included in the submitted narrative. We can provide links to the video work uploaded on Vimeo, YouTube or other platforms that can be openly accessed.
  6. We require a title page with the contributor’s contact information, a short abstract and a contributor’s bio as part of the submission process.
  7. Submissions must not be previously published nor should they be submitted for publication elsewhere while being reviewed by हाकारा । hākārā’s Editorial Board or outside reviewers.
  8. For the submission of research articles/essays(2500-3000 words), please follow the Modern Language Association (MLA) style. The contributors are requested to verify facts, names of people, places, and dates, and double-check all direct quotations and entries, and images in the Works Cited list.
  9. We request the contributor to obtain permission for illustrations, and images from the concerned to be used in submission. Also, translators submitting their work should seek necessary permission from the original writer/publisher if the work will be accepted by हाकारा । hākārā for the publication.
  10. Contributors would hear from the हाकारा । hākārā team a month after the submission regarding the decision on consideration of the work.
  11. For accepted contributions, हाकारा । hākārā Editors would be happy to work with contributors, if required, in finalising the work before its publication.
  12. Copyright remains with the contributor. However, if work on हाकारा । hākārā has been published elsewhere again in print or electronic format, we request the acknowledgement stating that the work was first published in हाकारा । hākārā, an online bilingual journal of creative expression published in English and Marathi. Visit www.hakara.in.
  13. At this stage, हाकारा । hākārā cannot pay contributors. But, we are seeking financial support that may help us pay our contributors in future.
  14. For any queries and submissions, please e-mail us: info@hakara.in
  15. हाकारा । hākārā: ISSN 2581-9976: Included in the University Grants Commission (UGC) CARE-LIST.

7 comments on “Submission Guidelines

  1. Vishal Khullar

    Please provide submission email ID.

    Reply
      • Bhagyashree q

        Please send me a mail i don’t have your mail to submit my painting Works

        Reply
  2. Shweta Raina

    I am a visual artist May I send a short 20-22seconds vedio as work .If yes then what is the lower and upper limit time.
    Also how many visual works (paintings or vedio) may be sent at a time.

    Reply
  3. Arushi

    Is there a word limit?

    Reply
  4. Prashant Hirlekar

    Great efforts

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *