Skip to content Skip to footer
Current Edition

Previous Editions

Spotlight

Discover an Artist

Authors List

Discover An Author

  • Artist

    Anuja Ghosalkar is a Bengaluru based artist. 'Drama Queen', her Documentary theatre company, focusses on personal histories & archives to extend the idea of theatre to create audacious work. Drama Queen’s debut show, Lady Anandi (2016) was written while she was an artist-in-residence at Art Lab Gnesta, Sweden. The Reading Room, blurs the boundary between audience and performer, where 10 strangers read personal letters alongside public ones. Her newest work, Walk Back to Look was a site -specific performance commissioned by the Serendipity Arts Festival 2018. In the past, Anuja has worked at India Foundation for the Arts, and Experimenta, in curating and teaching cinema, & as a researcher with University of Westminster.

    अनुजा घोसाळकर ह्या बेंगळूरूस्थित कलाकार आहेत. 'ड्रामा क्वीन' ही डॉक्युमेंटरी थिएटरमध्ये कार्य करणारी संस्था त्यांनी स्थापन केली आहे. वैयक्तिक इतिहास आणि अर्काइव्ह ह्यामधील नातेसंबंध मांडत कलारूप-मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांची संस्था करते. रंगभूमीची संकल्पना वास्तवाशी जोडत गंभीर प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा हेतू आहे. 'लेडी आनंदी' (२०१६) हे 'ड्रामा क्वीन'चे पहिले नाटक, अनुजा ह्यांनी स्वीडनमध्ये आर्ट लॅबमध्ये रहिवासी-कलाकार म्हणून काम करत असताना लिहिले. 'रीडिंग रूम' हे नाटक प्रेक्षक आणि सादरकर्ते ह्यांच्यातील अंतर कमी करते. ह्या प्रयोगात दहा अनोळखी लोक त्यांची व्यक्तिगत पत्रे उपस्थित लोकांसमोर वाचून दाखवतात. अनुजा यांचे 'वॉक बॅक टू लूक' ह्या प्रयोगाचे  सादरीकरण 'सेरेंडीपिटी आर्ट्स फेस्टीवल,२०१८' मध्ये पार पडले. ह्यापूर्वी, अनुजा यांनी 'एक्सपेरिमेंटा' बरोबर तसेच इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट्स संस्थेत काम केले आहे. त्यांनी, चित्रपटाची मांडणी आणि अध्यापन केले आहे. अनुजा वेस्टमिनिस्टर विद्यापीठामध्ये त्या संशोधक म्हणून कार्यरत होत्या.

इथे नमूद करावंसं वाटतं की हाकारा । hākārā अशा द्वैभाषिक परंपरेशी स्वतःला जोडू पाहत आहे, आणि ते इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये प्रकाशित होतं, असं असलं तरी द्वैभाषिक परंपरा हा मराठी वाङ्मयीन परंपरेचा सहज भाग आहे, ह्या पायावरतीच हाकारा । hākārā सारखी नियतकालिकं उभी आहेत. हाकारा । hākārā प्रकाशित करताना हा इतिहास आम्हांला महत्त्वाचा वाटतो, कारण तो आमच्या नियतकालिकाच्या द्वैभाषिकतेला सद्यःकालीन गरजेपलीकडे ऐतिहासिक परिप्रेक्ष्याचा आधार देतो. पाश्चात्त्य नियतकालिकांच्या प्रारूपांचे अनुकरण न करता किंवा जागतिकीकरणातील इंग्रजी भाषेच्या आकर्षणाऐवजी मराठीत असलेल्या बहुभाषिकतेच्या प्रवाहांचा विचार करत आम्ही मराठी साहित्य-संस्कृतीत आधीपासूनच असलेली, भाषिक सीमा ओलांडून अधिक खोल संवाद साधण्याची प्रवृत्ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

By publishing works in Marathi and English, हाकारा।hākārā seeks to align itself with this very bilingual tradition, standing firmly upon the premise that bilingualism is an integral part of Marathi literary heritage. This history of bilingualism is significant beyond merely the contemporary necessity of being in conversation with artistic discourse in English while publishing हाकारा । hākārā. Rather than giving in to the allure of the English language in an era of globalisation or emulating Western periodicals, we find it more pertinent to attend to the currents of multilingualism that have historically been inherent within the Marathi cultural universe and have shaped it. By being bilingual, we endeavour to carry forward a tradition long-established within Marathi literature and culture and transcend linguistic boundaries in order to foster a deeper, more profound dialogue.

आशुतोष पोतदार | Ashutosh Potdar
संपादक/Editorहाकारा | hākārā

आवृत्ती २५ : हाक / Edition 25: Call