कालकृति

विक्रम मराठे

मला धूळ ‘कण’ स्वरूपात दिसते. या कणांपासूनच साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूत सृष्टीचा अंश आहेच असे मला वाटते. आणि म्हणूनच त्या कणांमध्ये त्याच्या निर्मितीची प्रक्रिया आणि काळ अवशेष रूपात असतो.

साधारण २०१५ पासून मी गंज या माध्यमात काम करीत आहे. आमचा शालेय साहित्य उत्पादनाचा व्यवसाय होता, आम्ही लोखंडी प्ले ग्राउंड इक्विपमेंट पण बनवायचो. पावसाळ्यात आमच्या कारखान्यात फर्शीवर लोखंडाच्या गंजाचे डाग पडायचे, ते आकार आणि रंग कागदावर उतरवता येतील का? असा प्रश्न पडला. आणि काही प्रयोगानंतर त्यात यश मिळाले. त्याकाळी माझा ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांच्याशी पत्रव्यवहार होता. बर्व्यानी​सुद्धा  या कामाचे कौतुक केले होते. कागदावर लोखंडाचे तुकडे, धूळ गंजवून माझे चित्र तयार होते. लोखंड कागदावर गंजताना स्वतःचा आकार आणि रंग धारण करतातच पण तो काळही तिथे थांबतो. अश्या विचारातून माझी चित्रनिर्मिती सुरु झाली.

या टिपणासोबतची चित्रे ‘मॅटर ऑफ रस्ट’ या संकल्पनेतून आकारास आलेली आहेत. विश्व जसे द्रव्य किंवा जडवस्तु मधून निर्माण झाले आहे त्याप्रमाणे गंजापासून माझी चित्रे तयार झाली आहेत. ‘स्लाइस ऑफ टाईम’ असाही विचार या चित्रमालिकेत केला आहे. अनाहतकाळाची एखादी चकती काढली तर ती कशी असेल? अश्या विचारातून वर्तुळाकार कागदावर चित्रनिर्मिती केली आहे.

मी सध्या झपुर्झा – कला आणि संस्कृती संग्रहालयासाठी अभिरक्षक/क्युरेटर म्हणून काम करत आहे. त्यामुळे माझ्या भवताली अनेक जुन्या वस्तू असतात, ज्यात ती वस्तू वापरात असतानाचा काळ गोठलेला असतो. गंज जेव्हा कागदावर उतरतो तेंव्हा तो काळ तिथे थांबला आहे असे मला वाटते. म्हणून माझ्या आत्ताच्या चित्रात इथल्या वस्तू  कागदावर ट्रेस  केल्या आहेत.

back

विक्रम मराठे हे पुण्यात राहणारे चित्रकार आहेत. ते सध्या झपुर्झा – कला आणि संस्कृती संग्रहालयात अभिरक्षक म्हणून कार्यरत आहेत.

9 comments on “कालकृति: विक्रम मराठे

  1. Ànagha Tamhankar

    Concept is both fascinating. And paintings are engaging 👍

    Reply
  2. Alka

    Very nice Vikram Congrats

    Reply
  3. Bhanu

    Very nice congrsts

    Reply
  4. राज शिंगे

    खूप सुंदर काम आहे सर..चित्रांची रचना ,मांडणी आकर्षक आहे.

    Reply
  5. रोहिणी तुकदेव

    खूपच सुंदर! चित्रांची मांडणी आकर्षक आहे.

    Reply
  6. Aniruddha Abhyankar

    This is a great idea to freeze the time. The slices of time that you have created are fascinating.

    Reply
  7. Chetana

    Amazing ! Very interesting medium. Congratulations and Best Wishes

    Reply
  8. Nitin Bildikar

    वाह अप्रतिम, प्रयोगाला सलाम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *