मूळ कादंबरी:जोझे सारामागो

मराठी नाट्यरुपांतर: प्रदीप वैद्य

गजब कहाणी



back

Loader Loading…
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

गजब कहाणी या रूपांतरित नाटकाचा प्रयोग मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केला आणि त्याची निर्मिती आसक्त, पुणे या संस्थेने केली होती. या नाटकाचा पहिला प्रयोग २४ मे २०११ रोजी मुंबई इथे पार पाडला.

पोस्टर सौजन्य: आसक्त, पुणे.

प्रदीप वैद्य नाट्यप्रशिक्षक, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार,संगीतकार आणि प्रकाशयोजनाकार म्हणून ३५ वर्षे सतत कार्यरत. नाट्यलेखक आणि रूपांतरकार म्हणून प्रायोगिक रंगभूमीवर विपुल प्रमाणात काम केलं आहे. रूपांतरित केलेल्या नाटकांपैकी चैत्र (मूळ – फाल्गुनी/रविंद्रनाथ टागोर), तिची सतरा प्रकरणे (मूळ – Attempts On Her Life – Martin Crimp), एक रिकामी बाजू (मूळ – Tissue – Louise Page), गजब कहाणी (मूळ कादंबरी – An Elephant’s Journey – Jose Saramago) आणि उणे पुरे शहर एक (मूळ – बेंडा काळू ऑन टोस्ट गिरीश कार्नाड) ही नाटकं खूप गाजली. सध्या प्रदीप वैद्यलिखित काजव्यांचा गांव, हुताशनी, कोरा कॅनव्हास आणि उत्खनन ही नाटके रंगमंचावर सादर होत आहेत. नाट्यक्षेत्रातील आश्वासक कामगिरीबद्दल डॉ. श्रीराम व दीपा लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार हा पुरस्कार २०१२ मधे प्रदीप वैद्य याला दिला गेला आहे. अभिनेत्री आणि लेखिका असलेली त्याची पत्नी रुपाली भावे हिच्यासोबत, पुण्यात “द बॉक्स” या नव्या प्रकारच्या कला-अवकाशाची निर्मिती त्याने अलिकडेच केली आहे.

जोझे सारामागो (१९२२-२०१०) हे एक जगप्रसिद्ध पोर्तुगीज कादंबरीकार. त्यांना १९९८ मध्ये साहित्यासाठीच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. कादंबरीबरोबर सारामागो यांनी कविता, नाटके, निबंध आणि लघुकथांचे अनेक खंड तसेच आत्मचरित्रात्मक लेखन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *