राखाडी रंगाच्या छटांमधल्या दृश्य-प्रतिमा

केतकी सरपोतदार

राखाडी रंगाच्या छटांमधल्या दृश्य-प्रतिमा

आपण बरेचदा मानवी अनुभवांचा तर्कशुद्धपणे विचार करूनं त्यांचे पांढऱ्या किंवा काळ्या विभागात वर्गीकरण करतो. माझं काम ह्या दोन टोकांच्या मध्ये अस्तित्त्वात असलेल्या राखाडी रंगाच्या छटांमध्ये प्रवास करत असते . चूक किंवा बरोबर, सत्य किंवा असत्य अशा दोहोंच्या मधोमध  मी माझी जागा निवडलीय. त्यामुळे,  मी माणसाच्या मनाचा किंवा वागणुकीचा जे  बरेचदा प्रत्येक परिस्थिती मागचे मूलभूत कारण ठरते त्याचा अभ्यास करते. एखादी समस्या, मग ती वैयक्तिक असो वा जागतिक, तिला आपण प्रत्येक जण कसा प्रतिसाद करतो हे मला महत्वाचे वाटते. माझे कलाविषयक काम हे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला व्यक्ती देत असलेला प्रतिसाद  आणि त्या व्यक्तीची, प्रतिसाद देतानाची परिस्थिती यावर प्रकाश-झोत टाकते.

मी सुरुवातीला काम करताना पंचतंत्रातील गोष्टींना आधार मानून काम करत असल्याने माझ्या निर्मितीत अँथ्रोपोमोर्फिक आकारांचा समावेश होता. या मध्ये मी प्राणी किंवा निर्जीव वस्तूंमधून मानवी वैशिष्ट्ये मांडत असे. अलीकडे, मी मानवी  वर्तन आणि माणसाची वृत्ती मी निर्माण करत असलेल्या पात्रांतून दाखवते. मग यामध्ये, झूमॉर्फिक आकारांचा वापर करून माणसाचा प्राणी-रूपी वर्तनाचा विचार मांडू इच्छिते.  मी निर्माण करत असलेल्या दृश्यांचा कल्पना-स्रोत हा मी वाचलेल्या आणि ऐकलेल्या साहित्यातील काही तुकडे, लहान-सहान  गोष्टी, बोधकथा तर कधी-कधी कविता असतात. गोष्टी आणि कविता ह्या एकाद्या  व्यक्ती आणि समाजाला आत्मनिरिक्षण करायला लावतात असे मला वाटत आले आहे. गोष्टींमधून नैतिकता सांगितली सांगितली जाऊ शकते,  यामधून मिळणाऱ्या तात्पर्यातुन समाज शिकू  शकतो. या सर्वांचा एक परिणाम म्हणजे, एक सामूहिक चेतना निर्माण होण्यास मदत होऊ शकते. सद्याच्या काळात, माझे कुतूहल संस्कृत सुभाषिते, मराठीमधल्या  बोली भाषेतल्या म्हणी, वाक्यप्रचार यातून मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यात जास्त आहे. दैनंदिन जीवनात किंवा मराठीतील भाषिक वैशिष्ट्यांतून मानवी मन आणि समाज समजून घेण्यास चालना मिळते.     

उदाहरण द्यायचे तर, माझ्या चित्रकृतीचे शीर्षक अळवावरचे पाणी हे आहे. आता अळवावरचे पाणी हा एक मराठी वाक्यप्रचार असून  त्याचा अर्थ ‘तात्पुरते किंवा फार काळ न टिकणारे’ असा होतो. या शीर्षकातून  निरर्थक चालेल्या घरगुती संभाषणावर आणि आजूबाजूच्या तशाच निरर्थक वाटणाऱ्या कृती किंवा बाबींवर मी लक्ष केंद्रित करू इच्छिते. महामारीसारख्या भयानक काळात समाज एका बाजूला स्वतःच्या सक्षम अस्त्तित्वासाठी झुंजत असतानाच दुसऱ्या बाजूस काही जण आरामदायक आयुष्यही जगत होते. अर्थात, यामध्ये मीही कुठे कुठे होतेच- सहभागी होते आणि निरीक्षणही करत होते. तशी मी आरामदायक आयुष्य जगत होते. झगडण्याच्या या परिस्थितीतही आपल्या खिडकीतून खाली नुसतेच डोकावून पाहत होतो, टेलिव्हिजन पाहत होतो किंवा सोशल मीडिया वर सक्रिय राहून एखाद्या व्यावसायिक प्रवक्त्यासारखे  नुसतेच चर्चा आणि  वादविवाद करत होतो. खरंतर, संभाषणाची पुढची पायरी असते ती कृती करणे, कार्यात सहभागी होणे. कृतीशून्य चर्चा करत बसण्याची ही वृत्ती ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ या एका मराठी म्हणीशीही मला अत्यंत  मिळतीजुळती वाटली. दैनंदिन जीवनातील अशी संभाषणे मला अळवावरच्या पाण्यासारखी तात्पुरतीच  वाटतात. 

विचार करताना मला जाणवतं की एखाद्या परिस्थितीला मी उस्फुर्तपणे केलेल्या प्रतिसादाच रूपांतर नंतर त्याच परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करण्यात होते आणि तीच परिस्थिती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपासते. यापुढचा टप्पा म्हणजे त्या परिस्थितीसंबधातील विषय  साकल्याने आणि नीट समजून घेण्यास मला मदत होते. विषय समजून घेण्याच्या प्रक्रियेत माझी दृश्ये, त्यामधला मजकुर, तसेच त्यातील बहुस्तरिय आणि व्यामिश्र प्रक्रिया आकार घेतात. प्रक्रियेत मी रूपके मांडते. मी साकारलेली दृश्ये आणि केलेली दृश्यमांडणी यामधील गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय रूपकांना शोधण्यात आणि त्यांना समजून घेण्यात दर्शक गुंतून जातो. दृश्ये फक्त गोष्टीरूपात असू नयेत तर त्याकडे पाहणाऱ्याला त्यामध्ये, त्यातील आकारामागे लपलेला मतितार्थ पाहायला मदत करतात.

तर अशा माझ्या कामातून मला मानवता, वास्तवाचे स्वरूप आणि अंतिम सत्याला या संबंधातील खोल तात्विक प्रश्न उपस्थित करायची इच्छा असते.

A Spectrum of Greys

Things that seem morally obvious and intuitive now weren’t necessarily so in the past; many started with nonconforming reasoning. – Robert M. Sapolsky

We often tend to rationalize human experiences by labelling them as either black or white. My work traverses these polarities, and exists in the spectrum of greys that lies between them. I choose to place myself at the focal point of the polarities of truth and falsity, right and wrong, in order to analyse the human psychology that works itself in any given situation. Any issue, whether personal or global, depends upon how one responds to a particular situation. My work focuses on these human responses to socio-political situations and the psychology behind them.

Initially, I used to work with Panchatantra stories that involved anthropomorphic forms. But to focus on the psychology or the behavioural pattern of my characters, I have now shifted to allegorical zoomorphic narratives. I derive my visuals from literary pieces, short stories, and at times poetry and folktales. Folktales are intended to be a mirror that forces society to introspect. These tales teach ethics as well as morality which affect the collective consciousness of  society. Recently, I have also been more engaged with Sanskrit subhashita, and regional proverbs and phrases which retain their relevance even today. 

For example, the title of the work Aluva Varche Pani (water droplet on a colocasia leaf) is a Marathi phrase that means evanescent or something that disappears quickly.  I wanted to focus on the insignificance of the act portrayed in the painting through this title. At this crucial time, one side of the society struggles for their existence while the other side including myself has a comparatively comfortable life. We watch the situation from our windows, on television, and on social media, and have futile discussions, debates inside our homes like professional spokespeople. This reminded me of a Marathi proverb ‘sardyachi dhav kumpana pariyant’ (as per the behavioural pattern of lizards, it will never go beyond its territory) As time goes by, these debates, discussions and concerns vanish like the drop of water on a colocasia leaf.

The spontaneity of my initial reaction to any concern morphs into investigating the situation from different perspectives which results in a fuller and unified understanding of the subject. My visuals are thus a composite, multi-layered understanding of the text as well as the subtext, that engages spectators to delve into the baffling metaphors. This process releases the visuals from the narrative boundaries and helps the viewer see the unexpressed truth behind the forms. 

My works prod profound philosophical questions pertaining to the nature of reality, humanity and ultimately, truth itself.

केतकी सरपोतदार यांनी एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून २०१४ मधे  फाईन आर्टस् मधून डिप्लोमा पूर्ण केला असून त्यानंतरचे शिक्षण एम एस युनिव्हर्सिटी, बडोदा येथून २०१८ मधे पूर्ण केले. लॅटिट्युड या गॅलरी आणि टीएपी यांनी २०२० मधे आयोजित केलेल्या ‘व्हेअर इग्नोरन्स इज ब्लिस’ या ऑनलाईन चित्र-प्रदर्शनात तर एम एस युनिव्हर्सिटी बडोदा यांनी २०१९ मधे आयोजित केलेल्या  सोलो प्रदर्शनात केतकीने सहभाग घेतला होता. 
back

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *