हाक १९

Call 19


रंगगोपन

प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या जगात,  रंगगोपन म्हणजे शिकाऱ्यासाठी, सावजाला बेसावध ठेवण्याची तर सावजासाठी स्व- संरक्षणाची व्यवस्था. वृक्षांच्या बुंध्यांशी मिसळून जाणारे घुबडा-पिंगळ्यांचे रंग असोत, मादी माशीच्या दिसण्याची नक्कल करून, नर माशीला भुलवणारे ऑर्किडचे फूल असो, वृक्षवेलींच्या- पानाफुलांच्या रंगात मिसळून दिसेनासे होणारे फुलपाखरू किंवा सहज रंग बदलणारा सरडा– पृथ्वीवरील जीवसृष्टीस स्व-संरक्षण आणि शिकार करण्याचे मार्ग मिळत राहतात. मानवी जगात, रंगगोपन शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो – वेषांतर करण्यापासून ते भुलवून, फसवणूक करण्यापर्यंत किंवा संगनमत करण्यापासून ते जुळवून घेण्यापर्यंत. मुखवटे परिधान करण्याच्या उक्ती आणि कृती दर्शविणाऱ्या रंगगोपनात, सामाजिक व्यवस्थेत जात- धर्म- लिंग – वर्ग केंद्रस्थानी ठेऊन आपली ओळख उजागर करण्यापासून ती गोपनीय ठेवण्याचा खेळ असतो.

सर्जनशील निर्मिती आणि सांस्कृतिक व्यवहारात रंगगोपन दिसून येते. प्राचीन ग्रीक मिथकांपासून ते रामायण- महाभारत आदी महाकाव्यातून देव- देवता तसेच राक्षस गणांचे अद्भूत, मायावी आणि सामान्यांत होणारे रुपबदल प्रचलित आहेत. प्राणीमात्रांचे रंगरूप बदलून टाकणाऱ्या लहानांसाठींच्या गोष्टी तर अचंबित करण्यात आणि दचकवून टाकण्यात माहीर असतात.  पुढे जाऊन, अशाच गोष्टींचे  कल्पनारम्य फिक्शन किंवा विज्ञान कथारूप विकसित झालेले आपण पाहिले. ​लेखक आपली एखादी गोष्ट रूपकांमध्ये आणि दृष्टांत कथेत लपवेल. चित्र पाहताना आपल्याला त्यातील दृश्य घटकात लपलेल्या वेगवेगळ्या अर्थांना समजून घ्यावे लागेल. तर एखाद्याच्या अदबशीर बोलण्यातील कडवट छटा समजून घेताना आपल्या संवाद चातुर्याचा कस लागेल. एवढेच नव्हे तर दडवून ठेवलेल्या गुप्त कथनाला एखाद्या कळी ने उघडून दाखवणाऱ्या क्रिप्टोग्राफीचे रूपही रंगगोपनाचे. 

तुम्ही ‘रंगगोपना’कडे कसे पाहता? व्यक्ती आणि समाजातील गर्दीच्या मानसिकतेला सामोरे जाताना आपली ओळख झाकून ठेवण्यातून किंवा उघडकीस आणण्यातून काय साधले जाते? आपल्या नेहमीच्या जगण्यात रंगगोपनाद्वारे काहीतरी लपविण्यातून स्वतःचे संरक्षण करणे, छद्मीपणाने दुसऱ्याला फसविणे किंवा संगनमत करणे अशा गोष्टी कशा साधल्या जातात? सततच्या रंगगोपनातून अर्थ निर्मिती होते की ते हरवतात की त्यांच्यात बदल होतो? तुमच्या स्वतःच्या निर्मिती आणि संशोधन कार्यात रंगगोपन कसे प्रतिबिंबत होते? 

‘हाकारा‘च्या १९ व्या आवृत्तीतून ‘रंगगोपन’ या संकल्पनेच्या वेगवेगळ्या रूपांचा आणि त्यांच्या कलात्म अभिव्यक्तीचा शोध आम्ही घेऊ इच्छितो.

तुम्ही संगीतकार, दृश्य-माध्यमातील कलाकार, लेखक, गुंफणकार असाल किंवा समाजशास्त्रज्ञ किंवा तत्त्व -चिंतन मांडणारे असाल तर ‘हाकारा । hākārā’ च्या एकोणिसाव्या आवृत्तीच्या पारावर ‘रंगगोपन ’ च्या हाकेसाठी तुमचं स्वागत आहे. तुमचे लिखाण/कलाकृती जुलै २७, २०२३ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवा. निवडक लेख/कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल. अधिक माहितीसाठी, इथे भेट द्या. 

आशुतोष पोतदार  
संपादक, हाकारा । hākārā

(‘हाकारा’च्या एकोणिसाव्या आवृत्तीच्या अतिथी संपादक पूर्वी राजपुरिया असतील.)

संपादक मंडळ: अज़हर वाणी आणि आद्रिता चक्रवर्ती

_________________________

Camouflage

In the animal and plant kingdoms, camouflage has been a mechanism of cover for the hunter and self-defence for the hunted. From the spots on a leopard to the disappearance of the leaf-butterfly, or a chameleon on a bough, life on earth finds ways of self-protection and predation. In the human world, the word enters multiple significations—from disguise to deception, adaptation to connivance. It becomes synonymous with masking; we use social behaviour to mask our identities in the hierarchical order of cultures, races, and civilizations. 

Camouflage has also appeared prominently in creative and cultural practices. From Greek myths to the Ramayana, the transmogrification of deities and demons into mortal form is a running theme. Children’s tales from all over the world are replete with shape-shifting creatures to amuse and threaten, and we continue to see inventive iterations of the same figures in science fiction and fantasy today. In writing, we conceal imagination in metaphors, hide another story in an allegory. To understand a painting, we must decode layers of symbolic meaning embedded in every visual element. In speech, we camouflage our bitterness with polite utterances. Camouflage marks a presence in cryptography—veiled messages deciphered with a key.  

What does camouflage mean to you? What does it mean for an individual or community to camouflage their identity to match that of the crowd? What roles do self-protection, deception, and connivance play in our daily acts of camouflage? How is meaning made, lost, and transformed in an environment of constant shape-shifting? How do you visualise the theme of camouflage in your creative and research practices? 

With such questions and concerns, we would like to receive submissions from artists, scholars, researchers or writers for our 19th edition.

If you are a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, social scientist, translator, curator or anyone who is interested in addressing the theme of ‘Camouflage’, do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by July 27, 2023 to info@hakara.in. For more details, please see the submission guidelines. Select works will be published in the 19th issue of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar
Editor, हाकारा । hākārā

(Purvi Rajpuria will be the Guest Editor for the 19th Hakara edition.)
Editorial Team:
Azhar Wani and Adreeta Chakraborty