हाक ६

Call 6

|| रूप-खेळ ||

रूप वा आशयाची मांडणी कला – निर्मिती आणि संस्कृती व्यवहारातील महत्त्वाचा भाग असतो. आशयाची मांडणी एखाद्या कलावस्तूचे प्रत्यक्ष दृश्य रूप असते किंवा कला-वस्तूतील विविध घटक एकत्र येण्यातून रूप आकाराला येते. मानवी मन, समाज आणि माध्यमातून प्रवास करत काळ-अवकाशाच्या प्रवाहातून आशय बदलत जातो, तसेच कलेचे रूप देखील घडत आणि बदलत जाते. आशयाप्रमाणेच रूपं अस्थिर असतात. घडणं, मोडणं, बदलणं, रुपांतरित होणं असा रूप-खेळ चालू असतो.

अविरत चालू असलेला हा ‘रूप-खेळ’ समजून घेण्यात ‘हाकारा’ला रूची आहे. रूप आणि आशयातल्या परस्पर संबंधातून उभा राहाणारा रूप-खेळ आणि त्यातून तयार होणारी कलारूपं चक्रावून टाकणारी असू शकतात. रूप आणि आशयातले बहुपेडी संबंध  आणि त्यातून आकाराला येणारा कलात्म व निर्मिती व्यवहार या भोवती ‘हाकारा’ची सहावी आवृत्ती गुंफलेली असेल.

सांस्कृतिक जडण-घडणीच्या प्रक्रियेत निर्मिती आणि अभिसरणाची वेगवेगळी रूपं कशी एकत्र येतात? काळ आणि अवकाशात ही रूपं कशी साकारली जातात? एका कलारूपातून दुसरे कलारूप आकार घेताना कोणत्या प्रक्रिया समोर येतात? वेगवेगळया कलारूपांची सरमिसळ, त्यातले बदल, त्यांच्यातले आंतरिक संबंध आपण कसे समजून घेतो? बदलत्या सामाजिक आणि तंत्रवैज्ञानिक संदर्भात नवी कलारूपं तयार करण्याचे कोणते मार्ग कलाकार अवलंबतात? या आणि इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही  ‘हाकारा’तून करू इच्छितो.

तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतक, साहित्यिक, कवी, किंवा दृश्य-माध्यमातील कलाकार, समीक्षक, किंवा गुंफणकार (क्युरेटर) असाल आणि तुम्हाला ‘रूप-खेळा’च्या संकल्पना-निर्मिती-व्यवहारामध्ये रूची असेल तर ‘हाकारा’च्या सहाव्या आवृत्तीच्या पारावर ‘रूप-खेळ/Form-Play’ या हाकेसाठी तुमचं स्वागत आहे.

तुमचे लिखाण/कलाकृती नोव्हेंबर १२, २०१८ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. लिखाण व कलाकृती पाठविण्याच्या सूचनासाठी लिंक पाहा. निवडक लेख / कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल.

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई

संपादक, हाकारा । hākārā

॥ Form-Play॥

Form or an expression of content has been a distinguishing feature of art and culture. The expression could be in the form of a physical entity that represents the content, or it could be the incorporation of various elements that form and design a work. Like content, form doesn’t remain static as it traverses through the human mind, societies or different mediums within time and space. Thus, form remains movable, mutable, transformable and playable.

हाकारा।hākārā is interested in exploring the intriguing nature and interconnectedness of content and form while focusing on ‘playing form’. Addressing the multi-fold relationship of the intrinsically connected worlds of content and form, we are interested in exploring artistic and scholarly practices that address and get unfolded through form-play.

Some of the questions we would like to address in the sixth edition are as follows: How do different forms of production, consumption and circulation merge in order to express or represent art and culture? How does the process of the change in form from one to another get evolved through time and space? How do human beings perceive transformation and interchangeability of form? What could be different ways and practices for an artist to construct and reconstruct form through changing technologies and societies?

Are you a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, translator, a curator or anyone who is interested in sharing concepts and practices regarding ‘रूप-खेळ/Form-play’? Do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by November 12, 2018 to info@hakara.in. For submission guidelines, please click here. Select works will be published in the forthcoming issue of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā[

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *