हाक ७

Call 7

|| हद्द ||

हद्द म्हणजे दाखवता येणारी रेघ किंवा न दिसणारी लक्ष्मण रेषाही असू शकेल. एखादा टापू, अभ्यासाचे कार्यक्षेत्र, विशिष्ट सांस्कृतिक जग वा भौगोलिक प्रदेश, ज्ञानाची वा एखाद्या चित्राची चौकट हद्दीतून ठरत जाते. कल्पित वा वास्तवातल्या हद्दीमुळे विचारांचे वा इलाख्यांचे वेगळेपण समोर येत असते. हद्द फक्त वेगळेपण दर्शवित नसते तर ती संगती दाखवत समन्वयकाच्या रूपात एखाद्याला अर्थवाहीपण देत असते. हद्दीमुळे अस्ताव्यस्त मिश्रणातून समोर येणारा गोंधळ टाळता येऊ शकतो. शिवाय, आपल्या जगापेक्षा वेगळे जग दुसऱ्या बाजूला असू शकते याचीही जाणीव होते.

परंतु, हद्दी आखण्याच्या प्रकियेत नियंत्रण, संघर्ष आणि त्यातून अनागोंदी निर्माण होऊन ताठर आणि उतरंडीच्या व्यवस्था आकाराला येऊ शकतात.

मूलतः हद्द ताठर असते की लवचिकतेच्याही शक्यताही दर्शवित असते? ती चैतन्यमयी अवकाशाची निर्मिती करते की अनागोंदीच्या कारभाराचे कारण असते? सांस्कृतिक, सामाजिक वा राजकीय वा तत्सम हद्दीकरणातून व्यक्तीच्या मुक्तपणे व्यक्त होण्यावर कशाप्रकारच्या मर्यादा येतात? नाविन्यपूर्ण अभ्यासातून हद्दीच्या बंदिस्ततेला छेदून आपण अभ्यास आणि कृती क्षेत्राची पुनर्मांडणी कशी करू शकतो? हद्द-रेषा पुसण्यातून आपल्या भवतालाचे आणि अभिव्यक्तीचे नवे आकलन कसे करुन घेता येईल? हद्दी पुसट झाल्याने नवी कलारूपे किंवा अभिव्यक्तीची रूपे समोर येतात का?

तुम्ही चित्रकार, तत्त्व -चिंतक, साहित्यिक, कवी, किंवा दृश्य-माध्यमातील कलाकार, समीक्षक, किंवा गुंफणकार (क्युरेटर) असाल आणि तुम्हाला ‘हद्द/Boundary’ या विषयाच्या संकल्पना-निर्मिती-व्यवहारामध्ये रूची असेल तर ‘हाकारा’ सातव्या आवृत्तीच्या पारावर तुमचे स्वागत आहे.

तुमचे लिखाण/कलाकृती एप्रिल १५, २०१९ पर्यंत आमच्याकडे info@hakara.in वर पाठवून द्या. लिखाण व कलाकृती पाठविण्याच्या सूचनासाठी लिंक पाहा. निवडक लेख / कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल.

निवडक लेख/कलाकृतींचा समावेश ‘हाकारा’च्या येत्या अंकात केला जाईल.

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई

संपादक, हाकारा । hākārā

Boundary

Boundary is a line, physical or abstract, that defines limit of something: an area of study, geographical location, cultural field, a discipline or even a frame of a painting. Real or imaginary, a boundary separates one idea or an area from another. It indicates where one territory / area ends and another begins.

A boundary can help us facilitate a coordination, bring coherence and provide meaning to something. It may also help avoid immediate confusion. Conversely, it may lead to control, conflict and chaos as it creates rigid structures and hierarchies.

How do social, cultural, gender and national boundaries impact different forms of expression? Do new areas of study or conceptual frameworks push or redefine these boundaries? Are boundaries elastic by nature? Do they create dynamic spaces? Does blurring the boundaries lead to new artistic  forms of expression? Does transcending a boundary (e.g. self and the other) give us a newer understanding of the world?

Are you a story-teller, writer, scholar, poet, visual artist, critic, photographer, social scientist, translator,  curator or anyone who is interested in sharing concepts and practices regarding ‘हद्द/Boundary’?

Do send your work in Marathi and/or English or in audio-visual form by April 15, 2019 to info@hakara.in. For submission guidelines, please click here. Select works will be published in the forthcoming issue of हाकारा । hākārā.

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā

4 comments on “Appeal for Call 7

 1. Bhaskar Hande

  चांगला उपक्रम आहे. माझे सहकार्य मिळेलच

  Reply
 2. Dinkar Bedekar

  interesting. would like to join.

  Reply
 3. Tilottama bhowmick

  I really like this page where I can see diverse works all over artists. I am also interested to submit my works.

  Reply
 4. Prashant Pitaliya

  I would like to write something this time too …very explanation of topic is excellent …i read it thrice just enjoy the words on boundry …crossing my boundry of reading once only …well begun …

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *